व्हिडिओ

Neeraj Chopra: भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलं

ऑलिम्पिकमधून भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावल आहे. भारताचं सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न हुकलेलं आहे मात्र रौप्य पदक नीरज चोप्राने पटकावलेल आहे.

Published by : Team Lokshahi

ऑलिम्पिकमधून भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावल आहे. भारताचं सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न हुकलेलं आहे मात्र नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलेलं आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला आजवर एकाच खेळाडूकडून दोन पदकं मिळालेली आहे तर पाकिस्तानच्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड बनवत सुवर्ण पदक जिंकल्याचं समोर आलं आहे. तर भालाफेकमध्ये पाकिस्तानचा एक खेळाडू आणि भारताचा नीरज चोप्रा हे स्पर्धक आमने-सामने होते मात्र यावेळी नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलं तर दुसरीकडे पाकिस्तानने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे.

यापार्श्वभूमीवर नीरज चोप्रा व्यक्त होतं म्हणाला, वैयक्तिकरित्या मेडलची गोष्ट वेगळी आहे पण, आता सुधारणा करण्याची वेळ आहे. तसेच ज्या गोष्टींची कमी आहे त्या गोष्टीत टीमसोबत चर्चा करून सुधारणा करण्याची वेळ आहे. तसेच जर पाहायचं झालं तर आपली भारताची कामगिरी ही चांगली चालू आहे. सुवर्ण, रौप्य किंवा इतर कोणत्याच मेडलसोबत कोणत्याच खेळाडूची तुलना करू नका. जे खेळाडू अ‍ॅथलेटिक्समध्ये खेळायला आले आहेत, ते मनापासून खेळले आहेत. गरजेचं नाही आहे प्रत्येक वेळेस आपल्या मेडलमध्ये वाढ होईल कधी-कधी खेळाडूंना तशी टक्कर पण द्यावी लागते आणि ते थोडे चुकतात सुद्धा, पण यानंतर जेव्हा आपले खेळाडू खेळतील तेव्हा आपल्या मेडलमध्ये देखील वाढ होईल, असं नीरज चोप्रा म्हणाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?