पीएफआय संघटना प्रकरणात एनआयए देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. एनआयएने विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी छापा टाकला. परंतु, वाहिद शेखने दरवाजा उघडलेला नाही. जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले आहेत.