मतदानाच्या वेळी फतवे आणि सत्ता गेल्यावर यांना भगवा आठवतो, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे दुसरा दाऊद आहे त्यांचा बंदोबस्त करा असं देखील नितेश राणे म्हणाले आहेत.
निवडणुकीमध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आपले उमेदवार निवडून यावेत म्हणून फतव्यांचा आसरा घेतला जसा आपल्याला त्या दाऊदपासून धोका होता तसा आता या उद्धव ठाकरेंपासून आपल्याला धोका आहे. हा जितका वेळ महाराष्ट्रात आणि मुंबईत असेल तेवढा या राज्याला आणि मुंबईला धोका आहे. यांचा काय तो बंदोबस्त करा आणि या राज्याला आणि मुंबईला अतिरेकी मुक्त करा, असं नितेश राणे म्हणाले आहेत.