अंतरवली सराटीमध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.