व्हिडिओ

Mumbai: मुंबईच्या माझगाव डॉकमधून एकाला एटीएसकडून अटक

Published by : Dhanshree Shintre

महाराष्ट्र एटीएसने प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली. हा हनी ट्रॅपचा प्रकार असून याप्रकरणी एटीएसने आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनेक महिन्यांपासून समाज माध्यमावर एका महिलेशी चॅटिंग करीत होता.

महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. आरोपी महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असल्याचा संशय आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून ती त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत होती, असा दावा एटीएसच्या सूत्रांनी केला आहे. यापूर्वीही डिसेंबरमध्ये, महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माझगाव गोदीत काम करणाऱ्या २३ वर्षीय गौरव पाटीलला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) एजंटसोबत गोपनीय माहिती सामायिक केल्याप्रकरणी अटक केली होती.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा