व्हिडिओ

Video : ...तरच बेस्ट मुंबईत राहील, बेस्टभवनात नारायण राणेंचे वक्तव्य

बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक अडचणींवर नारायण राणे यांनी मांडले विचार, राज्यशासनाची मदत आवश्यक.

Published by : Team Lokshahi

बेस्ट उपक्रम हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. आज बेस्टचे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर श्रीनिवासन यांची बेस्टभवन कुलाबा येथे भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यामांशी संवाद साधला आहे.

नारायण राणे म्हणाले की, "मी आज बेस्ट उपक्रमात जनरल साहेब यांना समर्थ कामगार सेनेला सोबत घेऊन भेटायला आलो आहे. कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळेस त्यांना म्हटले की, बेस्ट मुंबईकरांची ओळख आहे. चांगली सेवा दिली पाहिजे त्यासोबतच कामगारांचे प्रश्न सोडवण्यात आलो आहे. कामगारांचे पाच प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. बेस्ट टिकली तर युनियन टिकेल. बेस्टची आर्थिक परिस्थिती सध्या पहिल्यापेक्षा आधिक खराब आहे. बेस्ट आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेली आहे. बेस्टला मोठ्या रकमेची मदतीची गरज आहे. आज बेस्टला जवळजवळ ८ हजार बसची गरज आहे. निवृत्ती वेतन त्यासोबतच कोवीडमधला कामगारांचा भत्ता देण्यात आला नाही. यासर्व गोष्टीवर GM यांच्या सोबत चर्चा केली. कामागारांचे चार- पाच प्रश्न आहेत परंतू ते आर्थिक आहेत. हे प्रश्न GM च्या आवाक्या बाहेरचे आहेत. राज्यशासनाने मदत केली तरच बेस्ट मुंबईत राहील" असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा