व्हिडिओ

नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Published by : Team Lokshahi

नागपूर: नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. नागपुरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल आहे.

नरेंद्र नगर रेल्वे ब्रीज खालील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद करण्यात आला आहे. ब्रीज खाली पाणी साचल्याने पाण्यात ट्रक अडकला आहे. रात्री बारा नंतर जोरदार मेघगर्जनेसनेसह तुफान विजांचा कडकडाटही सुरू झाला असून, सुमारे चार तास मुसळधार पाऊस कोसळला. गडचिरोली, चंद्रपूर , गोंदिया, भंडारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासोबत नागपूर यवतमाळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर