आंदोलनाला कोणताही हिंसक वळण लागणार नाही यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बस जाळण्यात आलेली होती, ट्रकला सुद्धा आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकार्यांनी हे आवाहन सगळ्यांना केल्याचं पाहायला मिळतंय.