व्हिडिओ

Paithan Vilas Bhumare: पैठणमध्ये प्रचारादरम्यान विलास भुमरेंना भोवळ ; हाता-पायाला 3 ठिकाणी फॅक्चर

पैठण विधानसभा मतदारसंघ पैठणमध्ये प्रचारादरम्यान विलास भुमरेंना भोवळ आली आहे भोवळ येऊन कोसळल्याने हाता-पायाला 3 ठिकाणी फॅक्चर झालं आहे.

Published by : Team Lokshahi

पैठण विधानसभा मतदारसंघ पैठणमध्ये प्रचारादरम्यान विलास भुमरेंना भोवळ आली आहे भोवळ येऊन कोसळल्याने हाता-पायाला 3 ठिकाणी फॅक्चर झालं आहे अशी माहिती समोर आली आहे. तर यादरम्यान विलास भुमरे हे गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. विलास भुमरे हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून पैठण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहेत.

विलास भुमरे हे संदिपान भुमरे यांचे पुत्र असले तरी त्यांनी मतदारसंघात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पैठण परिसरात त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जाते. विलास भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम उभारले आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या विविध कृषी विषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विलास भुमरे यांची जातीनिशी उपस्थिती असते.

संदीपान भुमरे यांच्या वतीने जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात विलास भुमरे यांचा चांगलाच पुढाकार होता. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत देखील कार्यरत होते. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पैठणमधून दत्ता गोर्डे जे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आहेत ते विलास भुसरेंच्या समोर आव्हान असणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी