व्हिडिओ

Kolhapur : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढला

पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूटांवर वाढली.

Published by : Team Lokshahi

पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटापर्यंत गेली. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले अनेक बंधारे खुले होण्यास सुरुवात झाले आहेत. ७० बंधारे अद्यापही पाण्याखाली गेले असून नदीची इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00" इतकी वाढली आहे. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रस्त्यावर पंचगंगेचे पाणी येण्यास सुरुवात झाले आहे. धरणातून विसर्ग वाढवल्यास कोल्हापूर- पन्हाळा मार्गावर पाणी येण्याची शक्यता येऊ शकते. पूर्ण रस्त्यावर पाणी आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंदही केला जाऊ शकतो.

पुराचे पाणी बघायला गेल्यावर तोल जाऊन झाडावर रात्रभर अडकलेल्या व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत असणाऱ्या KDRF टीम ने सुटका केलीय. कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेल्या वारणा नदीत काखे-मांगले या गावाजवळ ही घटना घडली होती.बजरंग खामकर हा व्यक्ती रात्री आठ वाजल्यापासून झाडावर अडकून होता.आज सकाळी काहींच्या ते निदर्शनास आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची धावळप उडाली.यावेळी कोल्हापूरच्या KDRF टीम ने बोटीच्या माध्यमातून त्याची सुटका केली. यावेळी त्याला कारण विचारले असता पाणी बघायला गेल्याने तोल गेल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पक्षाच्या जवानांनी रेस्क्यू करून त्याला सुखरूप बाहेर काढलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा