नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. नववर्षात पवार कुटुंब यावं यासाठी आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलं आहे. घरातील सगळे वाद संपू दे,वर्षभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत यासाठी आशा पवारांनी पंढरपुरात विठुरायाला साकडं घातलं आहे. यादरम्यान आशा पवार यांनी पंढरपुरात विठ्ठला घातलेलं साकडं खर होणार का? तसेच पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत.
याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बद्दलचा निर्णय या दोघांनीच घ्यायचा आहे. त्यांच्या कोणत्याच निर्णयावर भाजपकडून कोणत्याच प्रकारचा नाही असा करार नाही आहे. त्या पक्षाने निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये कोणीही बोलण योग्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच अमोल मिटकरी म्हणाले की, आशा पवार अजित पवार यांच्या आई आहेत आणि त्या पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या दरम्यान त्या जे काही बोल्या ते त्यांनी पत्रकाराला दिलेली प्रतिक्रिया होती.. त्या घरातील ज्येष्ठ्य आहेत आणि घरातील वरिष्ठ्यांना असं वाटत की आपलं कुटुंब एकत्र यावं. मात्र, एकत्र येणं हे एका बाजूने होतं नाही तर त्यासाठी दोन्ही बाजूकडून होणं महत्त्वाचं असतं, आता त्यांचा तो प्रश्न त्या कुटुंबातील वरिष्ठ आणि पक्षनेते ठरवतील त्यांना काय करायचं असं म्हणत अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.