आता तुमच्या घरावर सरकारची नजर असल्याचं समोर येत आहे, कारण घराच्या मेंटेनन्सवरही GST लागणार असून दरमहा मेंटेनन्सवर 7,500 हून अधिक खर्च होत, असल्यास कात्रीजास्त मेंटेनन्सवर 18 टक्के GST लागण्याची शक्यता आहे. मोठ्या फ्लॅट, अपार्टमेंट आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. आता तुमच्या घराच्या मेंटेनन्सवरही GST लागण्याची शक्यता आहे.
तुम्हाला दरमहा 7500 हून अधिक अधिक मेंटेनन्स भरावा लागत असेल तर, त्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जाण्याची शक्यता आहे. हा जीएसटी सरसकट लावला जाणार नाही. त्यासाठी मेंटनन्स मर्यादा लावली जाणारे. त्यानंतर अपार्टमेंटचा देखभाल खर्च दरमहा 75,000 रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा सोसायटीचा एकूण देखभाल खर्च 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर, त्यांच्यावर 18% जीएसटीचा नियम लागू होईल.
एकीकडे शहरीकरण झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे सरकार अपार्टमेंट, किंवा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी हा धक्कादायक निर्णय घेणार आहे. त्यामुळे मोठ्या फ्लॅट, अपार्टमेंट आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.