व्हिडिओ

Ayodhya PM Modi : राम मंदिर विकसित भारताचा साक्षीदार असेल : पंतप्रधान

राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अयोध्या : राम अग्नी नसून ऊर्जा आहे. तो भारताचा आधार आणि विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानंतर ते बोलत होते.

मलाही प्रभू रामाकडे क्षमा मागायची आहे. आपल्या त्याग आणि प्रयत्नांमध्ये अशी काही कमतरता होती की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव भरून निघाली आहे. माझा विश्वास आहे की. देव मला नक्कीच माफ करेल, असेही त्यांनी म्हंटले आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. प्रभू रामाच्या न्यायासाठी प्रदीर्घ लढाई झाली. न्यायव्यवस्थेने न्यायाचा मान राखला आहे. आता कालचक्र पुन्हा बदलेल. ही केवळ विजयसाठीच नाही तर विनयसाठीही संधी आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा