पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी भेट दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सपत्नीक पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. दरम्यान मोदींच्या या भेटीवर शिवसेनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूडासारखी व्यक्ती त्या पदावर असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडलं जातं. हे सरकार घटनाबाह्य आहे असं वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आहेत आणि काल त्यांच्या घरी हे प्रधानमंत्री पोहोचले. त्याच्यामुळे ह्याच्या मागे काही वेगळं काही घडतंय का? हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसारखे महाराष्ट्रात स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते. या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या असे संजय राऊत म्हणाले.