राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. अजित पवार पार्थ पवार यांना पक्षात सक्रिय करणार असल्याचं कळतंय. पुण्यात झालेल्या बैठकीत त्यासंदर्भात चर्चा झाल्याची कळतंय. काल रात्री पुण्यात अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे. अजित पवारांनी नेमलेल्या एजंसीकडून संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.