मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुक स्थगित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक स्थगित झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. 9 ऑगस्टला या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात 10 सप्टेंबर सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होत मात्र अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.