व्हिडिओ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?

उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृ्द्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृ्द्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील लोहोगाव पुलावर जीवघेणा खड्डा पडला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यातील काँक्रीट भरभरून खाली कोसळले. सुदैवाने या ठिकाणी आतापर्यंत अपघात झाला नाही. लोहगावनजीक एक कि.मी. लांबीचा पूल आहे. पुलावरील काँक्रीट खाली कोसळताना शेतकऱ्यांना दिसले. सध्या या ठिकाणी खड्डा दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर उद्या सायंकाळपर्यंत हे काम दुरुस्ती होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा