वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल झाले आहेत. छातीत दुखत असल्याने प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्ते यांनी दिली असून ह्रुदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील 3 ते 5 दिवस ते रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.