सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाही आहेत उलट बिघडवतायत त्यामुळे प्लिज माझ्या देशाला वाचवा म्हणून विनंती केली, असं टीकास्त्र प्रणिती शिंदेंनी डागल आहे. माझ्या देशाला आणि माझ्या मातृभूमीला वाचवा,हे तुमच्याच हातात आहे, असं प्रणिती शिंदेंनी नागरिकांना आवाहन केलं. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावाही प्रणिती शिंदेंनी केला आहे. सोलापूर शहरातील शास्त्री नगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे यांनी या टीका केल्या आहेत.
लाडकी बहीण पण बंद होणार... प्रणिती शिंदे
लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आता संजय गांधी निराधार पण बंद झाल आणि लाडकी बहीण पण बंद होणार... लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे. पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि सौरक्षण मिळणार आहे का? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल नंतर खा मार नवऱ्याचा.. पैसे घेऊन दारू थांबणार नाही, मग काय उपयोग..? पैसे घेऊन बिनधास्त जगायला मिळणार आहे? सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मात्र भाजपला वाटत तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला पाहिजे. देशाला वाचवा एवढी विनंती करते, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी या टीका केल्या आहेत.