संसदेत प्रणिती शिंदे यांचं मराठीत भाषण ऐकायला मिळालं यादरम्यान प्रणिती शिंदे म्हणाल्या की, माझ्या मतदार संघात काही वर्षापासून समांतर जलवाहिनीच काम प्रलंबित आहे. सोलापुर शहराला अजून ही 5- 6 दिवसांतून एकदा पाणी मिळत. म्हणून हे काम नितीन गडकरी असतील मुख्यमंत्री असतील हे दोघ चांगले मित्र देखील आहेत. कारण तिथे भूसंपादनचे खुप विषय आहेत. शेतकऱ्यांना अजून देखील कॉम्पसेशन मिळत नाही आहे.
त्यामुळे धरण असून देखील त्याच्यावर काहीच नियोजन मिळालेल दिसत नाही आहे त्याच्यामुळे सरकारने एकत्र बसून यावर काय तो तोडगा काढावा. तसेच त्यांच्या आजूबाजूला जे गाव आहेत तिथे तलावांमध्ये दूषित पाणी सोडल जात त्यामुळे तिथली जमिन खराब झाली आहे आणि तिथे काही पिकवू शकत नाही आहेत त्याच्यावर पण लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली आहे.