व्हिडिओ

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी लिहिलं भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पत्र; पत्रात काय?

सोलापूरमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे.

Published by : Dhanshree Shintre

सोलापूरमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पत्र लिहिलं आहे.

प्रणिती शिंदे या पत्रात म्हणाल्या की, मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापुरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं.

लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील 40 दिवस यांचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू. अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्यावतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा