इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला असून कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपलेली आहे. तर कोरटकरच्या जामीन अर्जावर येत्या 9 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय सुनावणी देणार आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांचा अवमान केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारागृह कारवाई करण्यात आली होती. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपलेली असताना 9 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयीत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या सुनावणीत प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर केला. लवकरच कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकरची सुटका होणार असल्याची माहिती समोर येत आहे.