इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी केल्याच्या प्रकरणांमध्ये प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडी आज संपते आहे. त्याला काही वेळातच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज प्रशांत कोरटकर ला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रशांत कोरटकरची मर्सिडीज जप्त
त्याचसोबत कोरटकरसंबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. फरार काळात कोरटकरने वापरलेल्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमध्ये कोरटकर मर्सिडीज घेऊन गेल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कोरटकरची मर्सिडीज जप्त केली आहे. महिंद्रा गाडी नंतर आता मर्सिडीजही जप्त करण्यात आली आहे.