नाशिक: इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील जुनवनेवाडी या ठिकाणाहून गरोदर महिलेला रात्री अडीच वाजता प्रसूतिवेदना झाल्याने रस्त्याअभावी पायपीट करत दवाखाण्यात जावे लागल्याने, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालेला आहे.
कच्चा रस्ता हा चिखलमय झाल्याने, पायपीट करत महिला दवाखान्यात पोहचली. पण दवाखान्यात पोहचताच तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. यानंतर मृतदेह देखील डोली करून जुनवणे वाडीवर नेण्यात आले.
कोट्यवधी रुपये इगतपुरी तालुक्यात रस्त्यांवर खर्च होत आहेत. पण, हा पैसा नेमका कुठे जातो? गतिमान सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी जनतेला याचा फटका बसत आहे. राज्यात चालले तरी काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.