Kurla Bus Accident 
व्हिडिओ

Kurla Bus Accident: क्लच समजून एक्सीलेरेटर दाबलं; Sanjay More याचा पोलिसांना जबाब

कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, क्लच समजून एक्सीलेरेटर दाबल्यामुळे अपघात झाला. त्याला ऑटोमॅटिक वाहन चालवण्याची सवय नसल्यामुळे गोंधळ झाला.

Published by : Team Lokshahi

कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी संजय मोरेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याला ऑटोमॅटिक वाहन चालवण्याची सवय नसल्यामुळे गोंधळ झाला. त्याने स्पष्ट केले की, क्लच नसलेल्या गाड्या चालवणं त्याच्यासाठी गैरसोयीचं होतं, आणि बस चालवताना त्याने क्लच समजून अॅक्सिलेरेटर दाबला. संजय मोरेला ड्रायव्हिंगचा अनुभव असला तरी, त्याने कधीही ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती, आणि 1 डिसेंबरला त्याने पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली होती. तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबईतील कुर्ला येथे घडलेली घटना भीषण होती. ब्रेक फेल भरधाव बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा