PM Modi  Team Lokshahi
व्हिडिओ

अनावरणप्रसंगी पंतप्रधानांनी घेतला ढोल वाजवण्याच्या आनंद

प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाजवत आनंद घेतला, CMO महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर केला

Published by : Sagar Pradhan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. हे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मात्र, या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला आहे.

पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. CMO महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. समृद्धी महामार्गाच्या कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्री @narendramodiयांचे पारंपरिक पद्धतीने लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाजवत आनंद घेतला. असे त्यामध्ये लिहले गेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद