व्हिडिओ

Prithviraj Chavan : 'राज्यात विधानसभेला मविआला 183 जागा मिळतील' पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

राज्यात महाविकास आघाडीला 183 जागा मिळतील कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्याच्या जनतेमध्ये महायूतीवरून नाराजी निर्माण झाली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात महाविकास आघाडीला 183 जागा मिळतील कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्याच्या जनतेमध्ये महायूतीवरून नाराजी निर्माण झाली आहे असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये त्याच्या प्रत्येय समोर आल्याचं महत्त्वाचं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मविआ लोकसभा निवडणुकीमध्ये आला 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या म्हणजेच 65 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तेच प्रमाण जर विधानसभेला लावलं तर 288 पैकी 65 टक्के म्हणजे 183 जागा होतात. म्हणजे 183 जागांपेक्षाही जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे.

महायुतीमध्ये जे काही जागा वाटपाबद्दल, पक्षात राहायचं आहे की नाही, पक्षात राहायचं की नाही राहायचं हे जे काही वातावरण चालू आहे. त्याच्या तुलनेत महाविकास आघाडीचं जागा वाटप हे स्मुदली चालू आहे. शेवटी तीन पक्षाचं जागा वाटप हे फार सोपं आहे आणि सोप जात आहे. ते सोप जाईल नाही जाईल हे मला काही म्हणायचं नाही आहे, पण आमच्यामध्ये फार कमी तणाव आहे. तसेच आम्ही चांगली प्रगती करत आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....

Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती