वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा विजय झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांना घवघवीत यश मिळालं. सत्येन मोकेरी 4 लाख मतांनी वायनाडमधून पराभूत झाले. प्रियंका गांधी वड्रा यांनी आज खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी संपूर्ण गांधी परिवार संसदेत उपस्थित होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रियंका गांधी यांना खासदारकीची शपथ दिली. संसदेत प्रवेश करताना राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना थांबवलं आणि त्यांचे संसदेत प्रवेश करतानाचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले.