Rahul Narwekar 
व्हिडिओ

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड

विधानसभेत एकमताने राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून विधानसभेत एकमताने राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले असून राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Assembly Monsoon Session : आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Horoscope|'या' राशीच्या व्यक्तींचा दिवस असेल उत्साहवर्धक, तर काहींना नोकरीत मिळणार यश, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार