व्हिडिओ

Raigad Mahayuti: रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला ; महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खडे बोल

रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

Published by : Team Lokshahi

रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला गेला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे सुनील तटकरेंना खडे बोल सुनावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच गद्दारी कराल तर श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू असं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना इशारा दिला आहे. तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याचं देखील समोर आलं आहे.

यापार्श्वभुमीवर महेंद्र थोरवे हे म्हणाले, आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवारसुद्धा राष्ट्रवादीचे तटकरे साहेबांना निवडून आणलेलं आहे. परंतू जिल्ह्यामध्ये यासाऱ्या नेत्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला पाहिजे. लोकसभेला आपण प्रमाणिकरणे काम केलं आहे. परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झाला आहे. महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्याठिकाणी सुरु झालेलं आहे. या मतदार संघामध्ये महाड मतदार संघ तर आम्ही कसाही खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदार संघसुद्धा शिवसेनेचे बालेकिल्ला होता हे विसरता कामा नये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप