मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौ-यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक तसंच पदवीधर निवडणुकीबाबत या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांसोबतशी चर्चा करणार आहेत. ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.