पिंपरी : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत असल्याची शंका व्यक्त केली आहे. आपल्याला वाटतं आपण जातीसाठी काहीतरी करत आहोत. पण, हे कुणीतरी चालवत आहे, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये 100 व्या मराठी नाट्यसंमेलनात बोलत होते. यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.