व्हिडिओ

Ramesh Kadam | 'बाबा सिद्दिकींसारखा प्रकार माझ्यासोबत होऊ शकतो', रमेश कदम यांच्या जीवाला धोका

रमेश कदम यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'बाबा सिद्दिकींसारखा प्रकार माझ्यासोबत होऊ शकतो', असे त्यांनी सांगितले आहे.

Published by : shweta walge

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही अशी तक्रार रमेश कदम यांनी केली आहे.

रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतचा ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आला आहे. दरम्यान रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिली असल्याच समोर आलं आहे. मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांच्याबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात. तर मुख्य सूत्रधार आबासाहेब काशीद याचा शोध सुरु असून तीन पथकं त्याच्या मागावर आहेत. आरोपींवर रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे किंवा जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?