व्हिडिओ

Sangli: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपाची एंट्री, स्वबळाचा नारा देत उमेदवारी जाहीर

Published by : Dhanshree Shintre

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत. नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणुक घडवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे. माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक