लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोग आज अधिसूचना जारी करणार आहेत. अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपाच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे लढणार असल्याची शक्यता आहे.
भाजप विरोधात शिवसेना उबाठा असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नारायण राणे मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.