महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाला कोणतं खातं आणि मंत्रिपद मिळणार याबाबत तर्क लढवले जात आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
याचपार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. रविंद्र चव्हाणांकडे भाजपमध्ये नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची शक्यता आहे. तर 2029मध्ये भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट असणार असणार आहे.
यावेळी 130 पेक्षा जास्त आमदार भाजपचे निवडून आले असले तरी देखील त्यांच्यासोबत बहूमताचा आकडा पार करण्यासाठी मित्रपक्षाची गरज आहे. पुढच्या वेळेला भाजपचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न असेल आणि याचपार्श्वभूमीवर भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता जे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे.