विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात.
यातच पुण्यात रवींद्र धंगेकरांचे बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आमचं ठरलंय, कसब्यात धंगेकर..नो ताई...नो भाई असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
कसबा विधानसभेसाठी काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. बॅनरच्या माध्यमातून कसबा मतदारसंघात धंगेकरच असा आशय बॅनरवर लिहिण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून हा बॅनर लावण्यात आला आहे.