व्हिडिओ

Sushma Andhare : सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, सुषमा अंधारेंना खात्री, पाहा काय म्हणाल्या?

Published by : Dhanshree Shintre

सांगली लोकसभेकरिता अखेर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. विशाल पाटलांनी सांगलीतून बंडखोरी केल्याचं आता पाहायला मिळतंय. सांगलीत जर आपण पाहिलं तर गेले अनेक दिवस विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आग्रही होते.

संजय राऊत यांनी त्या ठिकाणी दौरा केला नंतर वक्तव्य केल्यानंतर या संदर्भात नाराजी विशाल पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथून काँग्रेसचाच उमेदवार असावा असं विशाल पाटील वारंवार म्हणत होते. विश्वजीत कदम हे देखील दिल्लीला गेले होते. दिल्लीत देखील अनेक बैठका झाल्या. सांगलीत पुढच्या काही वेळात आता महाविकास आघाडीचा मेळावा सुरु होण्यापूर्वीच इथे काँग्रेसकडून AB फॉर्म दाखल करण्यात येत आहे.

सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी यावर सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मा अंधारे म्हणाल्या की, विशाल दादांच्या भावनांबद्दल आदर आहे आणि त्यांनी काही वर्षे तिथे मेहनतही घेतलेली आहे आणि जरी त्यांनी आज अर्ज दाखल केलेला असेल तरीसुद्धा अर्ज परत घेण्याची तारीख अजून दिलेली नाही. आम्हाला खात्री आहे की त्यांनाही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करताना भाजपला जर आता भिडायचं असेल तर निश्चितपणे एकत्र सगळ्यांना यावे लागेल या म्हणण्यावर त्यांचाही विश्वास पटेल.

मला खात्री आहे की ते अर्ज मागे घेतील. अर्ज त्यांनी धरला ठिक आहे त्याची नाराजी त्यांनी दाखवली त्यांच्या भावनांचा आदर आहे आणि निश्चितपणे त्यांचा पक्षसृष्टी आणि सगळी माणसं त्यांची समझूत काढण्यात यशस्वी होतील. त्यांनी त्यांची नाराजी पोहचवण्यासाठी जी प्रतिकृती असेल तर आता मला असं वाटतं की त्याचा बाऊ न करता उलट त्यांची एकूण मनस्थिती समजून घ्यायला हवी आणि मनस्थिती समजून घेत त्यावर तोडगा काढायला पाहिजे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...