मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 1994 चा फॉर्म्युला उपयुक्त असून मराठवाड्यातील 'माधव' घटकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना संविधानिक पद्धतीने ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देणे शक्य आहे, असा दावा आरक्षण विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलाय.