व्हिडिओ

Riteish Deshmukh Speech | झापुक झुपूक, बुक्कीत टेंगुळ; भावाची सभा रितेश देशमुखने गाजवली | Lokshahi

लातूरमध्ये धीरज देशमुख यांच्या प्रचारसभेत रितेश देशमुख यांनी भाजपावर जोरदार टीका करत धर्म आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले.

Published by : shweta walge

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेता रितेश देशमुख यांचे भाऊ धीरज विलासराव देशमुख हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ लातूरमध्ये प्रचारसभा पार पडली. या प्रचार सभेत रितेश देशमुखांनी सभेला संबोधित केलं. यावेळी त्याची डायलॉगबाजी पहायला मिळाली.

रितेश देशमुख यांनी भाजपावर टीका करत सांगितले की जो पक्ष तुम्हाला धर्म बचाव म्हणतो. धर्म धोक्यात आहे म्हणतो. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत, आमचा पक्ष धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला वाचवा. यांच्या भूलथापांना बळी पडण्याची गरज नाही. त्यांना म्हणा, धर्माचे आम्ही बघून घेतो, आमच्या कामाचे सांगा… तुम्ही पिकाचा भाव सांगा… धर्माचा आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा, असे रितेश याने धीरज देशमुख यांचा प्रचार करताना प्रश्न उपस्थित केले आहेत.

तसच आज आपले युवक लातूर पॅटर्नला शिक्षण घेत आहेत. यावेळी जोरात बटण दाबा… यावेळी झापुक झुपुक वातावरण झाले आहे. समोर गुलिगत धोका आहे, असे म्हणत रितेशने भाजपा उमेदवार रमेश कराड यांच्यावर निशाणा साधला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा