Sachin Pilot 
व्हिडिओ

'महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सरकार बहुमताने येईल' काँग्रेसचे नेते सचिन पायलट

महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सरकार बहुमताने येईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी मिळून आम्ही निश्चित विजयी होऊ, असे त्यांनी नांदेडमध्ये सांगितले.

Published by : shweta walge

ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण आहे. याचा आम्हाला फायदा आहे. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मिळून ही निवडणूक लढवत आहोत. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे सत्तेत बसले आहेत.त्यांना यावेळेस सत्तेच्या बाहेर जावं लागेल.महाराष्ट्रातील हा संदेश संपूर्ण देशात जाईल असे विधान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी आज नांदेडमध्ये केले.

जिथं जिथं आम्ही महाविकास आघाडी मिळून लढत आहोत तिथं आम्ही नक्की विजयी होऊ. दरम्यान काँग्रेस एक व्यक्ती नाही,एक विचारधारा आहे. काँग्रेस पक्षात अनेक लोक आलेत आणि अनेक जण गेले आहेत.परंतु काँग्रेस पक्ष हा आपल्या मेहनतीवर आणि आपल्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहे.भोकर मधील काँग्रेस पक्षाचा उमेदवार मॅनेज आहे किंवा नाही हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल असे सचिन पायलट म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shidne : पुण्यात 'जय गुजरात' घोषणेवरून वाद; शिंदे गटाचं स्पष्टीकरण आलं समोर

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून