सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडून राऊतांचा घरकोंबडा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. राऊत घरकोंबडा रोज सकाळी आरोळी देतो असं खोत यांनी म्हटलं आहे. राऊतांनी राज्यात आग लावण्याचे धंदे बंद करावेत असं खोत यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा टोल मात्र सुटलेला आहे.