थोडक्यात
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरण
फ्लोअर पॉलिशिंगचे काम करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु
अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सैफ अली खान यामध्ये जखमी झाला आणि सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या फ्लोअर पॉलिशिंगचे काम करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून या दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.