अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला राहत्या घरी चाकूहल्ला झाला होता. या प्रकरणात छत्तीसगडमधील दुर्ग या ठिकाणी राहणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे त्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. छत्तीसगडमधील 31 वर्षीय तरुण 'आकाश कनोजिया' नावाच्या ड्रायव्हरच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे.
पोलिसांनी संशयित म्हणून याच तरुणाचे फोटो प्रत्येक रेल्वे स्टेशनवर व्हायरल केले होते. 18 जानेवारीला मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कनोजियाला दुर्ग स्टेशनवरुन संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांची नोकरी तर गेलीच, शिवाय ठरलेलं लग्न देखील मोडलं आहे. या प्रकरणामुळे आकाशच्या कुटुंबाची सर्वत्र बदनामी झाली आहे.