पावसाअभावी राज्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय आणि त्यावर सरकार दरबारी काही उपाय योजना दिसत नसल्याचं भाष्य करत सामानाकडून राज्यसरकारवर टीका करण्यात आलेली आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. नगरसारख्या जिल्ह्यात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळचा वणवा आहे. शाळा बंद पडतील, गावांचे स्थलांतर होईल. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज या राज्यकर्त्यांत दिसत नाही. असा घणणात सामन्यातून केला आहे.