समरजित घाटगेंचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधील प्रवेश निश्चित झाला आहे. समरजित घाटगे जयंत पाटलांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर दोघं एकत्र कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी (आज ) कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमध्ये आयोजित केला आहे. घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.