व्हिडिओ

Sambhaji Raje : संभाजीराजे तुळजाभवनीच्या दर्शनासाठी दाखल

सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन संभाजीराजे हे रॅली द्वारे विशाळगडाकडे रवाना होणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन संभाजीराजे हे रॅली द्वारे विशाळगडाकडे रवाना होणार आहेत. दरम्यान विशाळ गडाला पोलीस छावणीचं स्वरूप आल असून कोणताही कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतल्याचे पाहायला मिळते. विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवाव या मागणीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने अतिक्रमण का काढले नाही असा सवाल उपस्थित करत राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडाकडे रवाना होणार आहेत.

विशाळगडावर सध्या पोलिसांचा मोठा फौज तैनात करण्यात आला आहे. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता ते पोहोचलेले आहेत. दर्शनानंतर ते किल्ले विशाळगडावर जाणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा