बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी म्हटले होते. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार आहे, अशी घोषणा संभाजी राजे छत्रपती यांनी केला.