संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. यामागे काही दडलंय का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. यावेळी त्यांनी धनंजयमुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी देखील केली आहे.
संभाजीराजेंनी उपस्थित केलेले सवाल वाल्मिक कराडवर १४ गुन्हे दाखल असतानाही त्याला शासनाकडून सुरक्षा पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केला आहे. त्यांनी विचारले, "जर कराड निर्दोष असेल, तर शरणागती पत्करायला त्याला २२ दिवस का लागले?" तसेच, कराडचं शेवटचं लोकेशन पुणे असतानाही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, हा सवाल देखील त्यांनी उचलला आहे