व्हिडिओ

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं आहे. गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करण्यात आलेली आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं आहे. गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करण्यात आलेली आहे. तर जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आलेली आहे. राहूल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं त्यांनी म्हटलं आहे, तर राहूल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. मात्र आता संजय गायकवाडांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला ठिणगी लागलेली आहे.

यावर संजय गायकवाड म्हणाले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातल रिजर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशाप्रकारचं वक्तव्य त्याठिकाणी त्यांनी केलं. कॉंग्रेसचा खरा चेहरा त्यांनी त्याठिकाणी दाखवून दिला, लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानात हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक नरेटिव्ह त्यांनी ठेऊन त्यांनी समाजाची मत घेतली.

आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करू लागले आहेत म्हणजे 100 टक्के त्यांना मागासवर्गीयांच, आदिवासींचं आणि इतर ओबीसी असं सगळ्याचं आरक्षण संपवायचं आहे. माझा आवाज आहे जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला मी 11 लाखाचं बक्षीस देईन, असं संजय गायकवाड म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा